TSK

TSK · नहे 1:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.

पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.

¶ तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.

आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.

योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.

त्यांनी पुन्हा तुझ्या नियमाकडे वळावे म्हणून तू त्यास बजावलेस. तरी हट्टीपणाने वागून त्यांनी तुझ्या आज्ञा ऐकण्याचे नाकारले. जो कोणी तुझ्या आज्ञा पाळतो तो जिवंत राहतो. पण त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले. त्यांनी आज्ञापालन केले नाही, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही व त्यांनी त्या ऐकण्याचेहि नाकारले.

जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.

¶ आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो.

मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची आणभाक केली नाही.

मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत.

कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.