TSK

TSK · गण 13:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले.

दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.

कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही.

¶ यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.

हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.