शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञा पाळतील.
TSK
TSK · गण 17:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”
तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;
¶ ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवीची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरूप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.
तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.