जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे.
TSK
TSK · गण 17:5
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
¶ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरूद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरूद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत.
पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.
निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल.
मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.