TSK

TSK · गण 18:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आणि ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास आहे अशा सर्व देहधाऱ्यांचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. पृथ्वीवर जे सर्व आहे ते मरण पावतील.

आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.

लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर.

पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील.

इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.

मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल.

कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,