नंतर वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल यांतले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्रावर तसेच त्याच्या पुत्रावर व त्यांच्या वस्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्र आणि त्याच्याबरोबर त्याची मुले व त्यांची वस्रे पवित्र होतील.
TSK
TSK · गण 18:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
अहरोनाची पवित्र वस्रे त्याच्यानंतर त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावी, म्हणजे या वस्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढया सतत चालू राहावा; या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल.
जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी; शांत्यर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा त्या पोळीवर हक्क आहे.
¶ परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.
¶ “त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.
लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
मग तुमचा देव परमेश्वर एका ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्यास तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा; होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, परमेश्वरास अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशु-पक्षी यांचा पहिला गोऱ्हा, घेऊन जा.
यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एक दशांश भाग आणून दिला.
नीतिमत्त्व तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंददायी तेलाचा अभिषेक केला आहे.”
पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.