दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने लोकांस सांगितले, “तुम्ही भयंकर पाप केले आहे! परंतु आता मी परमेश्वराकडे पर्वतावर जातो; काहीतरी करून कदाचित मला तुमच्या पापांचे प्रायश्चित करता येईल.”
TSK
TSK · गण 25:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
¶ इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे.
यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.
शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.
एलीया म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”
¶ अहरोनाचे वंशज असे मोजले, अहरोनाचा पुत्र एलाजार. एलाजाराचा पुत्र फिनहास. फिनहासचा पुत्र अबीशूवा.
हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.
ज्याप्रमाणे आकाशातील सैन्य मोजू शकत नाही आणि जसे समुद्रकाठच्या वाळूचे मापन होऊ शकत नाही. त्याप्रमाणे माझा सेवक दावीद याच्या वंशजांना आणि जे लेवी माझी सेवा करतात त्यांनाही मी बहुगुणित करीन.”
¶ मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.”
¶ पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.
ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन.