TSK

TSK · गण 35:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.

¶ जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.

हे नगर फार दूर असेल तर त्यास तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील व त्यास त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. खरे पाहता त्या मनुष्याच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.

म्हणजे जो चुकून, नकळत कोणा मनुष्यास जीवे मारले असता त्या हत्या करणाऱ्याने त्यामध्ये पळून जावे; याप्रमाणे ती नगरे रक्तपाताचा सूड घेणाऱ्यापासून आश्रयस्थाने अशी होतील.

गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”

गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.