TSK

TSK · ओब 1:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत;

आणि अर्धा गिलाद, आणि बाशानात ओगाच्या राज्यातली नगरे अष्टारोथ व एद्रई यांसुद्धाही; असे मनश्शेचा पुत्र माखीर यांच्या संतानांना, म्हणजे माखीराच्या अर्ध्या संतानांना त्यांच्या कुळाप्रमाणे प्राप्त झाले.

तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;

आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस

¶ अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले.

तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हासही तुम्हासोबत बांधकाम करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही तुमच्या देवाला शोधतो. आणि अश्शूरचा राजा एसरहद्दोन याने आम्हास या जागी आणल्यापासून तुमच्या देवासाठी आम्ही अर्पण करीत आलो आहोत.”

¶ यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो.

तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल. एफ्राइम यहूदाचा द्वेष करणार नाही, आणि यहूदा एफ्रइमाशी विरोध करणार नाही.

हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील.

अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय? तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”

“म्हणून, इस्राएल देशाला भविष्य सांग, आणि पर्वत, व टेकड्या, झरे आणि दऱ्या ह्यांच्याशी बोल. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी आपल्या आवेशाने आणि रागाने बोललो आहे. कारण, तुम्हास राष्ट्रांकडून अपमान सहन करावा लागला.”

मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.

¶ ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.

परमेश्वर असे म्हणतो, “अम्मोनांच्या संतानाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण त्यांनी गिलादामध्ये गर्भवतींना फाडून टाकले, ह्यासाठी की आपल्या देशाचा सीमांचा विस्तार करावा.

म्हणून तू आपल्या लोकांस, तुझ्या वतनाचा कळप जो रानात चरतो त्याला, आपल्या काठीने पाळ. जसे ते प्राचीन दिवसात तसे बाशानांत व गिलादांत ते चरोत.

¶ “अष्कलोन हे पाहील आणि भयभीत होईल! गज्जाचे लोक भीतीने खूप थरथर कापतील, आणि एक्रोन शहराची आशा नष्ट होईल. गाझामधील राजा नाश पावेल व अष्कलोनात यापुढे वस्ती राहणार नाही.