‹त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.›
TSK
TSK · फिलि 1:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो;
मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.
कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे.
कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?
पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरुन मला फार आनंद झाला.