TSK

TSK · फिलि 2:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुझ्यामध्ये व स्त्रीमध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व स्त्रीच्या बीजामध्ये मी शत्रूत्व ठेवीन. तो तुझे डोके ठेचील आणि तू त्याची टाच फोडशील.”

तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.

पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.

आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.

माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”

त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.

माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार. तो उंचावला जाईल आणि उंच व थोर होईल.

¶ त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल.

‹माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.›

‹माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.”›

‹पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.›

¶ “या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, ‹हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.›

त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत.

कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.

¶ त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.

¶ तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे वारशाने त्यास मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

¶ ‹ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.›

¶ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.