TSK

TSK · नीति 16:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

योसेफ त्यांना म्हणाला, “तुम्ही असे का केले? मला शकून पाहण्याचे ज्ञान आहे हे तुम्हास माहीत नाही का?”

तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे.

राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय, राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.

जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.

पाहा, राजा सदाचाराने राज्य करील, आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.

ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.

घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे.