TSK

TSK · नीति 17:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली. त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने माखीराची मुले ही पाहिली.

पण तुझे वडिल दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा पुत्र गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.

अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला.

तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.

पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.