TSK

TSK · नीति 19:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले.

¶ इस्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हास माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगळ्यांचा नाश होणार आहे.

कारण बंडखोरी जादुगीरीच्या पापासारखी आहे आणि हट्ट हा दुष्टपणा, मूर्तीपूजा व घोर अन्याय, मूर्ती करणे यासारखा आहे. तू परमेश्वराचे वचन नाकारले यामुळे राजा म्हणून त्याने तुला नाकारले आहे.”

मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्यास तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”

अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्याजवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहावी?”

तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.

परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.

ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.

पण तू म्हणतोस, “प्रभूचे मार्ग योग्य नाहीत,” इस्राएलाच्या घराण्या ऐक! काय माझे मार्ग अयोग्य आहेत? तुझे मार्ग अयोग्य नाहीत का?

लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.