TSK

TSK · नीति 29:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

“मी शौलाला राजा केले याचे मला दु:ख होत आहे. कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे वळला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” मग शमुवेलाला राग आला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराचा धावा केला.

तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले.

इस्राएलाचा राजा म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा पुत्र मीखाया.” पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते. यहोशाफाट म्हणाला, “इस्राएलाच्या राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”

इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.

त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.

नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.

व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.”

नंतर येशू म्हणाला, ‹“हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”› त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.

¶ ‹जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.›

¶ बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.