TSK

TSK · नीति 3:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही.

त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.

कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.

ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.

परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.

¶ म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.