ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
TSK
TSK · प्रक 16:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
ते अतिशय त्रस्त व भुकेले असे देशातून जातील. जेव्हा ते भुकेले होतील तेव्हा संतापून आणि त्यांच्या राजाला व देवाला आपली तोंडेवर करून शाप देतील.
आणि म्हणतात की जो कोणी पांढरा रंग देईल त्यांना म्हणा वेशी पडतील; त्यांच्यावर मुसळ धार पाऊस पडून गारा पडून ते कोसळून जाईल व वादळाने उध्वस्त होईल.
कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपल्या सर्व पर्वतावर त्याच्याविरुध्द तलवार बोलावीन. प्रत्येक मनुष्याची तलवार आपल्या भावाविरूद्ध चालेल.
¶ तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.
त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.