देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील, त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा, मग ती वाईट असो किंवा चांगली.
TSK
TSK · रोम 14:10
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.
जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे.
त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.
जो खातो त्याने न खाणार्यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
¶ तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.