तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
TSK
TSK · रोम 2:8
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत? प्रकाशाविना गहन काळोखात कोण चालतो? त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून रहावे.
‹जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.›
पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
¶ पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’
जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.
आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
¶ विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षरसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली.