TSK

TSK · रूथ 2:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.

अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती स्त्री राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती स्त्री आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”

‹दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.›

आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.