TSK

TSK · तीत 2:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु त्याने नकार दिला. तो त्याच्या धन्याच्या पत्नीला म्हणाला, “पाहा, घरात मी काय करतो याकडे माझा धनी लक्ष देत नाही आणि जे काही त्याचे आहे ते सर्व त्याने माझ्या ताब्यात सोपवले आहे.

परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.

देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.

‹तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.›

‹तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड›

त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला.

या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.

¶ सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.

¶ बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.

¶ जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.

¶ जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही

परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.

¶ ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे.