¶ मनश्शेचे काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. तो पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दावीदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, “दावीद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपल्या जीवाला धोका होईल.”
TSK
TSK · जख 8:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.
कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.
“यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो की, खचित मी आपल्या आवेशाच्या अग्नीने पेटून उरलेल्या राष्ट्रांविषयी व अदोमाविषयी बोललो आहे. त्यांनी माझ्या देशाला लुटून रिकामे करावे म्हणून त्यांनी उल्लासीत हृदयाने, त्यांच्या मनातील तिरस्काराने, त्यांच्या कुरणासाठी घेतली.”
¶ परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.
¶ मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे!