TSK

TSK · 1 इति 18:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”

तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”

त्यानंतर परमेश्वराच्या टेकडीला म्हणजे जेथे पलिष्ट्यांची चौकी आहे तेथे जाशील. आणि तू तेथे नगरास पोहचल्यावर भविष्यवाद्यांचा गट आणि त्यांच्यापुढे सतार, झांज, बासरी व वीणा वाजवणारे उंचस्थानावरून उतरत असता तू त्यांना भेटशील; ते भविष्यवाणी करीत असतील.

¶ एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.

मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.

नंतर अराममधील दिमिष्कात दावीदाने बस्थान बसविले. अरामी लोक दावीदाचे सेवक होऊन त्यास कर देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जेथे जेथे जात असे तेथे परमेश्वर त्यास जय देत असे.

परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.

दिमिष्क नगरात अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिष्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता.