TSK

TSK · 1 इति 23:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे.

आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते.

अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.

¶ इसहाराच्या वंशजापैकी कनन्या व त्याची अपत्ये इस्राएलांच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते. ते अधिकारी व न्यायधीश होते.

यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदीरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले

¶ शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा व त्याचे भाऊ, जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदीवासातून परत यरूशलेमेस आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदीराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते.

¶ बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती.

तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.