TSK

TSK · 1 योहा 5:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.

माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.

मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले,

‹पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, ›

¶ प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.

‹कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले.›

‹मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.”›

‹हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर”› तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”

या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला, आहे तो सुध्दा साक्षी आहे.”

¶ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

¶ कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.

जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.

¶ योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या राजासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.