¶ मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
TSK
TSK · 1 पेत्र 3:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.
¶ वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या;