इस्राएल लोकांनी परमेश्वराजवळ मोठ्याने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला इस्राएल लोकांच्या मदतीला उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
TSK
TSK · 2 इति 15:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांस मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.
¶ ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो. ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे!
हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
¶ पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’