TSK

TSK · 2 इति 23:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

देव म्हणाला, मी तुला साक्षपट देईन तोही त्या कोशात ठेवावा.

राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.

तेव्हा शमुवेल सर्व लोकांस म्हणाला, “ज्याला परमेश्वराने निवडले त्यास तुम्ही पाहता काय? त्याच्यासारखा सर्व लोकात कोणी नाही!” सर्व लोक ओरडून म्हणाले, “राजा दीर्घायुषी होवो!”

मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.

सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.

पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.

कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.

मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.

मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”

म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.

येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”

¶ परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.

¶ माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?

तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात

त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.