TSK

TSK · 2 इति 23:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,

आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.

¶ त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.

¶ दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:

याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.

हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.

बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.