TSK

TSK · 2 इति 36:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील.

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.

तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”

¶ कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.

¶ संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.

एखाद्या वावटळीच्या वाऱ्याप्रमाणे मी त्यांना अनोळखी राष्ट्रांमध्ये पांगवीन. त्यांचा देश त्यांच्या मागे ओसाड पडेल व तेथे कोणी ये-जा करणार नाही, कारण, त्यांनी उत्तम देश वैराण केला आहे.”