TSK

TSK · 2 शमु 13:29

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.

मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले.

मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला.

राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.

¶ नंतर अहज्याने आपला एक सरदार पन्नास मनुष्यांसह एलीयाकडे पाठवला. सरदार एलीयाकडे वर गेला, जिथे एलीया एका डोंगराच्या माथ्यावर बसला होता. सरदार एलीयाला म्हणाला, “हे देवाच्या मनुष्या (संदेष्ट्या) राजाने सांगितले, त्वरीत खाली ये.”

त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.