TSK

TSK · 2 शमु 18:2

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेव्हा गिदोन व त्याच्याबरोबर असणारे जे शंभर माणसे, ती मध्य प्रहराच्या आरंभी, नुकतेच मिद्यानी पहारेकरी बदली करत होते तेव्हा, छावणीच्या कडेला गेले; मग त्यांनी कर्णे वाजवले, आणि आपल्या हातातली मडकी फोडली.

मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली.

दावीदाने हे ऐकले, तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले.

मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले.

तेव्हा मी असे सुचवतो तुम्ही दानपासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएल लोकांस एकत्र आणा म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा.

सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.

जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.

परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?