माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
TSK
TSK · 2 तीम 1:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.
आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा.
¶ तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा.
परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे.
आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
‹मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्यास बळकटपणे धरून राहा.›
‹मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये.›