परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस.
TSK
TSK · प्रेषि 12:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
आणखी काही वेळाने तो परमेश्वराचे देवदूत दुसऱ्यांदा पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्यास स्पर्श केला आणि त्यास म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही.”
परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
तुझ्यासाठी हे चिन्ह होईलः या वर्षी तुम्ही जे काही आपोआप उगवेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगवेल ते खाल, परंतु तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्षमळे लावा आणि त्याचे फळ खा.
तेव्हा पाहा! पूर्वेकडून इस्राएलाच्या देवाचे तेज आले. त्याचा शब्द पुष्कळ जलांच्या ध्वनीप्रमाणे होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”
त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.
त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला;
¶ पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
¶ ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.