TSK

TSK · प्रेषि 13:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल.

परंतु असे झाले की त्यांनी तो तेथे नेल्यावर, परमेश्वराचा हात त्याच्यावर पडून त्या नगरात मोठा गोंधळ उडाला. त्याने नगरातली लहान आणि मोठी माणसे यांना पीडले. आणि त्यांच्या अंगावर गाठी उठल्या.

¶ अरामाच्या राजाने इस्राएलाशी लढाई करत असताना त्याने आपल्या सेवकाबरोबर मसलत केली, राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा.”

कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.

मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.

तेव्हा येशू म्हणाला, ‹“मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”›

हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.”

¶ बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.

ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.