जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका, तुमच्या ज्या भावांनी तुमचा द्वेष केला, ज्यांनी माझ्या नावा करीता तुम्हास बाहेर टाकले आहे, ते म्हणाले की आम्ही तुमचा हर्ष पाहावा असा परमेश्वराचा महिमा होवो. पण ते लाजवले जातील.
TSK
TSK · प्रेषि 13:50
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
‹एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.›
¶ त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते.
¶ स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमती होती. त्या दिवसापासून यरूशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले.
यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला.
¶ नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
तरीही पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहूद्यांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले.
कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.
त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;
¶ माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?