TSK

TSK · प्रेषि 2:20

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.

नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.

मी पृथ्वीकडे पाहिले आणि पाहा! ती उजाड आणि आकारविरहीत होती. मी आकाशाकडे पाहिले त्यामध्ये काही प्रकाश नव्हता.

तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.

फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.

¶ ‹सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.›

¶ ‹परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, › ‹‘सूर्य अंधकारमय होईल, › ‹चंद्र प्रकाश देणार नाही.’›

तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे.

पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.

¶ त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;