तुझ्या पित्याच्या नोंद-पुस्तकात शोधून पाहा आणि त्यावरुन हे नगर बंडखोर आहे राजांना व प्रांताला उपद्रव करणारे आहे आणि पुरातन काळापासून यामध्ये लोक बंड करीत असत. या कारणासाठी त्या नगराचा नाश करण्यात आला होता.
TSK
TSK · प्रेषि 25:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात.
¶ ‹जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.›
मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.
मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते.
हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्यास पाहा! याच्याच विषयी यरूशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे, याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.