TSK

TSK · प्रेषि 5:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत.

शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले.

तेव्हा एज्राने तेथे जमलेल्या लोकांसमोर नियमशास्त्र आणले. त्या वर्षाच्या सातव्या महिन्याचा तो पहिला दिवस होता. या सभेला स्त्री-पुरुष आणि ज्यांना वाचलेले ऐकून समजत होते असे सर्वजण होते.

माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.

तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली.

तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती.

शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे.

शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी ‘तो मार्ग’ अनुसरणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेम शहरास आणावे.

लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.

पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला.

यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात.