अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
TSK
TSK · प्रेषि 5:21
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
¶ मग दुसऱ्या दिवशी असे झाले, की त्यांचे अधिकारी, वडील व नियमशास्त्र शिक्षक हे यरूशलेम शहरात एकत्र जमले.
हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले.
परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता, त्याने न्यायसभेत उभे राहून त्या मनुष्यांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.
¶ दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.
कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.