TSK

TSK · प्रेषि 9:16

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ ‹जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.›

‹ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.›

¶ ‹“तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.›

आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही.

त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला, त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्यास यरूशलेम शहरातील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”

उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;

तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात.

कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही.

ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.