तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले!
TSK
TSK · आमो 8:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल.
¶ यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते.
नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे.
पुन्हा निरर्थक अशी अर्पणे आणू नका; धुपाचा मला तिटकारा आहे. तुमचे नवचंद्रदर्शन व शब्बाथ मेळे, असे पापी मेळे मी खपवून घेत नाही.
तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा.
एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय?
¶ म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका.