ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही.
TSK
TSK · दानि 9:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;
परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्यास चिथवले होते!
त्यांनी असे केले कारण इस्राएल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव, ह्याचा शब्द पाळला नाही. तर त्याच्या कराराचा भंग केला, म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञापिलेले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही.
अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.
हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन. कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे.
मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. कोणीही आपल्या केलेल्या वाईट कर्मांबद्दल ते क्षमा मागत नाहीत. जो असे म्हणतो, मी काय केले? असा कोणीएक नाही. तसा युद्धात घोडा धावतो तसे ते सर्व आपल्या मनात येईल तीथे जातात.
तेव्हा तू त्यांना असे सांग, परमेश्वर असे म्हणतो: कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडून अन्य दैवतांच्या मागे गेले आणि त्यांची पूजा केली व त्यांना नमन केले. त्यांनी मला सोडले आणि माझे नियमशास्त्र पाळले नाही.
¶ मग तुमच्या वाईट व्यवहारामुळे, तिरस्करणीय कृत्यामुळे परमेश्वराची सहनशक्ती संपली. नंतर त्याने तुमचा देश ओसाड, भीतीजनक आणि शापीत केला, म्हणून आजपर्यंत तेथे कोणी रहिवासी नाही.
¶ तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे.