TSK

TSK · अनु 2:14

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,

¶ तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.

¶ कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.

होरेबपासून कादेश-बर्ण्यापर्यंतचा प्रवास सेईर डोंगरामार्गे अकरा दिवसाचा आहे.

¶ परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला शपथपूर्वक तो म्हणाला,

तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिला ते तुम्हास माहितच आहे.

तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.

म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन.

परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती.

¶ जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहीती आहे तरी मी तुम्हास हे आठवून घावे अशी माझी इच्छा आहे की, परमेश्वराने त्या लोकांस मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले;