TSK

TSK · निर्ग 14:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा बाप अब्राहाम याचा देव आहे. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि माझा सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझे वंशज बहुतपट करीन.”

तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले.

¶ “परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”

अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!”

यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.

¶ मिसरमधील आमच्या पूर्वजांच्या यातना तू पाहिल्यास. आणि त्यांनी तांबड्या समुद्राजवळ केलेला धावा तू ऐकलास.

परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?

पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.

तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.

कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.

¶ भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.

टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,

तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.

इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.

तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!