TSK

TSK · निर्ग 19:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

ते मोशेला म्हणू लागले आमच्याशी तूच बोल, आम्ही ऐकू; देव आमच्याशी न बोलो, तो बोलेल तर आम्ही मरून जाऊ.

मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.”

परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.

तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.”