TSK

TSK · निर्ग 3:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मिद्यानी याजकाला सात मुली होत्या; आपल्या वडिलाच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या हौदात पाणी भरत होत्या;

त्या मनुष्यापाशी राहायला मोशे कबूल झाला. त्याने आपली मुलगी सिप्पोरा हिचा विवाह देखील त्याच्याशी करून दिला.

¶ मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा.

पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.

तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.

तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्यास पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांस हे सांग.

तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.

¶ मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”

आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात.

मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.

तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.

त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.

¶ तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.

“मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.”

¶ त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते.