TSK

TSK · निर्ग 3:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहित आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.”

गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, मी इस्राएलला कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्त्वाचा आहे.”

यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?

म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”

तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”

¶ मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले.

आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.