TSK

TSK · निर्ग 32:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

हा दिवस तुम्हास आठवणीदाखल होईल, हा दिवस परमेश्वरासाठी तुम्ही विशेष उत्सवाचा सण म्हणून पाळावा. तुमच्या वंशजांनी येथून पुढे हा सण पिढ्यानपिढ्या कायमचा विधी समजून पाळावा.

अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरून त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”

¶ परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे; ते हे,

¶ परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत: त्यादिवशी पवित्र मेळे भरवावेत; त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे.

याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यराबामाने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बली अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले याजकही नेमले.

येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.

बैर-शेबापासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली कि परमेश्वर देव ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणासाठी यरूशलेमेला यायला सर्व लोकांस आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.

इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्याने महाल बांधले आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.