त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा
TSK
TSK · निर्ग 6:8
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे.
तुझे सेवक अब्राहाम, इसहाक व इस्राएल, यांची आठवण कर; तू तुझ्या नावाने शपथ वाहिली होतीस; तू म्हणाला होतास, मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांइतकी जास्तीत जास्त करीन, मी ज्या देशाविषयी सांगितले तो सर्व देश मी तुझ्या संततीला देईन व तो सर्वकाळ त्यांचे वतन होईल.
मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?
आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
तसेच, इस्राएलाचे सामर्थ्य तो आहे, तो खोटे बोलणार नाही किंवा त्याचे मन बदलणार नाही; कारण मन बदलणारा असा तो मनुष्य नाही.”
प्रभू परमेश्वर म्हणतो, मी ज्या दिवशी इस्राएलास निवडून घेतले आणि माझे हात वर याकोबाच्या वंशजांना शपथ वाहिली आणि मिसर देशात त्यांना प्रकट झाले, मी माझे हात उंचावून शपथ वाहिली मी तुमचा परमेश्वर देव असे म्हणतो.
रानात मी हात उंचावून अशी शपथ वाहिली की, मी त्यांची राष्ट्रामध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीला लावीन.
जेव्हा मी तुम्हास इस्राएलच्या भूमीत घेऊन येईल, ज्या भूमिला हात उंचावून तुमच्या वाडवडीलांना दिली होती, मग तुम्हास कळेल कि मी परमेश्वर देव आहे.
आणि तुम्ही, प्रत्येक मनुष्य आणि तुमच्यातील बंधु यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पुर्वजांना द्यावा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्या सारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल.